UPSC Exam : कोरोनामुळे परीक्षा देता न आलेल्या ‘युपीएससी’ उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय विचाराधीन

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे केंद्रिय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परिक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याबाबत केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत दाखल याचिकेच्या प्रस्तावाचा निर्णय युपीएससीच्या विचाराधीन आहे.

कोरोनामुळे युपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या परीक्षार्थींना पुन्हा संधी देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परीक्षार्थींना पुन्हा एक देण्यासंदर्भात युपीएससी आयोगाला निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ए.एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत कोरोनामुळे नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा, असं न्यायालयानं यावेळी सांगितलं.

केंद्राने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना, परीक्षा देता न आलेल्या परीक्षार्थींना पुन्हा एक संधी देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र आणि युपीएससीच्या विचाराधीन असल्याच सांगितलं. या याचिकेवर पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.