UPSC Exam Update: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

UPSC Exam Update: Union Public Service Commission announces examination schedule

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शाखांच्या परीक्षाही रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली होती. यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या( UPSC) परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता यूपीएससीची परीक्षा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्याचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले आहे.

फॉरेस्ट आणि सिविल सर्विसेस प्रिलिम परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सिविल सर्विस मेन्स परिक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. फॉरेस्ट सर्विस मेन्स 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार असल्याची माहिती आज देण्यात आली आहे.

लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्र बदलून दिले नाहीत. सध्या UPSC करणारे विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पुन्हा परीक्षा केंद्र दिलेल्या ठिकाणी जावे लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे परीक्षा केंद्र दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.