UPSC Interview: यूपीएससीची परीक्षा पास झालेल्या उर्वरित 623 उमेदवारांची मुलाखत सुरू

UPSC Interview: Interview of remaining 623 candidates who have passed UPSC examination begins आयोगाच्या परिसरात पोहोचल्यानंतर उमेदवारांना एक सीलबंद कीट देण्यात येणार आहे, ज्यात मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायजर आणि हातमोजे असतील.

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2019 च्या परीक्षेसाठी 2 हजार 304 उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरु होती. त्याचवेळी सरकारने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर आयोगाने 23 मार्च 2020 रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन राहिलेल्या 623 उमेदवारांची मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. टाळेबंदी टप्प्याटप्याने शिथिल झाल्यानंतर आयोगाकडून उर्वरीत उमेदवारांच्या मुलाखती 20 ते 30 जुलै 2020 दरम्यान उर्वरित 623 उमेदवारांची मुलाखत घेतली जात आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना तसे कळविण्यातही आले आहे. उमेदवार, तज्ज्ञ सल्लागार आणि आयोगाचे कर्मचारी यांच्या सुरक्षेची व आरोग्याची चिंता लक्षात घेता योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.

रेल्वेसेवा अद्यापही पूर्णपणे कार्यरत नाही, त्यामुळे आयोगाने यावेळेपुरती उपाययोजना म्हणून मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना जाण्या-येण्याचा किमान हवाई प्रवास खर्चाचा परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांचे मुलाखतीसंदर्भातील ई-पत्र पाहून राज्य सरकारांनी प्रतिबंधित क्षेत्रातील उमेदवारांना परवानगी द्यावी, अशी विनंती आयोगाने केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांच्या राहण्याची आणि वाहतुकीची व्यवस्था केली आहे.

आयोगाच्या परिसरात पोहोचल्यानंतर उमेदवारांना एक सीलबंद कीट देण्यात येणार आहे, ज्यात मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायजर आणि हातमोजे असतील.

सहसा मुलाखत घेणाऱ्या सदस्यमंडळात ज्येष्ठ सल्लागारांचा समावेश असतो, हे लक्षात घेऊन आयोगाने उमेदवार आणि मुलाखत घेणारे सदस्य यांच्यासाठी स्पर्शरहीत मुलाखतीची तयारी केली आहे.

उमेदवारांच्या मुलाखतींसाठी आयोगाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचीही सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे.

मुलाखतीसाठीच्या सर्व खोल्या, हॉल, फर्निचर आणि इतर सामग्रीचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना सुरक्षित अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रोटोकॉल / मार्गदर्शक सूचना कळवण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.