UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या 2019च्या परीक्षांचा निकाल जाहीर

एकूण 829 उमेदवारांची नियुक्तीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली आहे. : Central Public Service Commission announces results of 2019 exams

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर, 2019 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या लेखी परीक्षेच्या निकालानुसार आणि 2019 च्या फेब्रुवारी-ऑगस्ट 2020 मध्ये व्यक्तिमत्व चाचणीसाठी घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे, भारतीय प्रशासनातील विविध सेवांसाठी गुणवत्तेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’ या वर्गवारीनुसार एकूण 829 उमेदवारांची नियुक्तीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली आहे.

11 उमेदवारांचा निकाल आयोगाकडून राखून ठेवण्यात आला आहे.

एखाद्या प्रलंबित प्रकरणामध्ये न्यायालयांद्वारे देण्यात येणाऱ्या आदेशानुसार नागरी सेवा परीक्षा 2019 च्या निकालात आवश्यक बदल करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे.

यूपीएससीच्या www.upsc.gov.in.या संकेतस्थळावर देखील निकाल उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांपर्यंत संकेतस्थळावर गुण पाहता येतील.

यूपीएससीच्या आवारातील परीक्षा हॉलजवळ एक ‘सुविधा केंद्र’ आहे.

उमेदवारांना त्यांच्या परीक्षा / भरती संबंधी कोणतीही माहिती / स्पष्टीकरण हवे असल्यास कामाच्या दिवसात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रत्यक्ष किंवा 23385271 / 23381125 / 23098543 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून मिळवू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.