Upstox Official Partner for IPL : ‘अपस्टॉक’ आयपीएलचा अधिकृत पार्टनर ; बीसीसीआयची घोषणा

एमपीसी न्यूज – व्हिवो आयपीएलसाठी ‘अपस्टॉक’ या ब्रोकींग कंपनीची अधिकृत पार्टनर म्हणून बीसीसीआयने घोषणा केली आहे. 9 एप्रिल 2021 पासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात होत आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या झालेल्या बैठकीत ‘अपस्टॉक’ची आयपीएल 2021 साठी अधिकृत पार्टनर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ही भागीदारी बहु वार्षिक असणार आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल म्हणाले, ‘अपस्टॉक’ची अधिकृत पार्टनर म्हणून झालेली निवड असून, हि आनंदाची बाब आहे. आयपीएलचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. तसेच, अपस्टॉक’चे युझर देखील अधिक आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याची मदत होईल.

अपस्टॉक ही डिजिटल ब्रोकींग कंपनी असून ती ट्रेडिंग, म्युच्युअल फंड या सारख्या गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.