पुणे महापालिकेत 23 गावे समावेशाच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाची मंजुरी !

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठीच्या प्रस्तावास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच अध्यादेशाची प्रक्रिया झाल्यानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे.

ही गावे महापालिकेत घेण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला होता. नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातच 10 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये अपेक्षित असून, पुढील वर्षी मार्च महिन्यापासून नवी प्रभागरचना करण्यास महापालिका प्रशासनाकडून सुरुवात होणार आहे.

त्यामुळे पुढील काही दिवसात ही गावे महापालिकेत समाविष्ट होतील. पुणे महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या या गावांमध्ये महाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), पिसोळी, मांजरी (बु.), नऱ्हे, मंतरवाडी, शेवाळेवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नांदेड, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, नांदोशी-सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, वाघोली, किरकटवाडी, खडकवासला, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि होळकरवाडी यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.