Urmila To Join Shivsena : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा

एमपीसी न्यूज – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. उर्मिला मातोंडकर काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देत राजकारणापासून गेल्या होत्या. मात्र, त्या आपल्या राजकीय कारकिर्दीची पुन्हा सुरूवात करणार असून, सोमवारी त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं माहिती आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

_MPC_DIR_MPU_II

उर्मिला मातोंडकर यांच्याबाबत त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसंच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं समोर आलं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.