Urse Tollnaka News : ट्रकचालकाला मारहाण करत लुटणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज -गाडीला कट मारला याचा कारण करत ट्रक चालकाला व त्याच्या सोबतच्या इसमाला मारहाण करुन लुटणाऱ्या आरोपीला शिरगाव (Urse Tollnaka News) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर उर्से टोलनाक्याजवळ शुक्रवारी (दि.3) रात्री घडली.

याप्रकरणी शैलेशकुमार दयाशंकर पासवान (वय 32 रा.शिकारपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिरगाव पोलिसांनी कारवाई करत नवनाथ किसन भोसणे (वय 38 रा.चिखली) याला अटक केली आहे.

Dighi News : पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन दलाकडून सुटका

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे  त्यांच्या ट्रकमध्ये फ्लिपकार्ट कंपनीचा माल घेऊन भिवंडी वरून पुण्याच्या दिशेने येत असताना उर्से टोल नाक्यावर आरोपीने वेगात त्याची स्वीफ्ट कार आणून फिर्यादीच्या ट्रकला घासली.यात आरोपीचा गाडीच्या आरसा तुटला, त्याने त्याची कार टोलनाक्याच्या पुढे थांबवली.

 

फिर्यादीच्या ट्रकला अडवून दगडाने ट्रकचा आरसा फोडून फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच ट्रकमध्ये सोबत असणारे ट्रम मालकाचे नातेवाईक राम स्वरूप कासवान (वय 43 रा.राजस्थान) यांनाही मारहाण करुन (Urse Tollnaka News)  त्याच्या खिशातील 20 हजार रुपये हिसकावून घेतले.पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली असून शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.