Urshe: विनाकारण फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी उर्सेगावच्या उपसरपंचाने केले रस्ते बंद

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उर्से ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावात विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने गावातील सगळे रस्ते बंद केले आहेत. उर्से-तळेगाव, उर्से-परदंवडी, उर्से-आढे रोडवर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. याबाबतची माहिती उपसरपंच प्रदीप धामणकर यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी, देखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे उर्सेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील विनाकारण फिरणाऱ्यांना आळा बसण्यासाठी गावातील रस्ते बंद केले आहेत.

उर्से -तळेगाव रोड, फर्स्ट शिफ्ट फिनोलेक्स केबल, सेकंड शिफ्ट फिनोलेक्स प्लासन, उर्से -परंडवडी रोड बंद केला आहे. या रस्त्यावर विविध खासगी कंपन्यांचे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. गावात कोण येते किंवा जाते या या वर लक्ष ठेवण्यासाठी उर्से ग्रामपंचायतीचे मुबारक मुलानी, शिवाजी कारके, पद्माकर सावंत यांची नेमणूक केली आहे.

दुकानदार, भाजी विक्रेते यांनी एक मीटर अंतर ठेवून विक्री करावी. सॅनिटाइझरचा वारंवार उपयोग करावा. बाहेर प्रत्येक दुकानदारांनी सॅनिटाइझरची बाटली ठेवणे बंधनकारक केले आहे. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांने त्याचा वापर करूनच वस्तूंची विक्री करावी. कोणी आजारी असल्यास संशयित असल्यास किंवा आढळल्यास आरोग्य विभागाच्या अंजली सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.