Usain Bolt Test Positive : जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण

बोल्टने नुकताच त्याचा 34वा वाढदिवस फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले आहे.

एमपीसी न्यूज – जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्ट याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जमैकाच्या या धावपटूने स्वत:ला बाधा झाल्याचे आपल्या ट्विटर हॅडलवरून सांगितले असून तो सध्या होम क्वारंटाइन आहे.

बोल्टने नुकताच त्याचा 34वा वाढदिवस फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले आहे.

बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.