Google Doodle : ‘मास्क वापरा, जीव वाचवा’ , गुगलचं खास डुडल

'Use Masks, Save Lives', Google's special doodle appealing citizens to use masks to prevent spread of corona.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूंच्या संसर्गाने सबंध जगाला विळखा घातला आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने रुग्णांची वाढ होत असून दररोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. जगात विविध ठिकाणी कोरोनावर प्रभावी औषध शोधण्याचे काम सुरू आहे मात्र, यावर अजूनही खात्रीशीर इलाज सापडला नसून काळजी घेणे गरजेचे आहे.

गुगलने तयार केलेल्या डुडलच्या माध्यमातून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच वारंवार हात धुणे आणि सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी याच गोष्टी उपयुक्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

* कोरोनाचा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी –

#आपले हात वारंवार स्वच्छ करा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल-आधारित हॅंड रब वापरा.

#खोकला किंवा शिंक येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा.

#शारीरिक अंतर शक्य नसल्यास मास्क घाला.

#आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करु नका.

#आपण खोकल्यास किंवा शिंकत असल्यास आपले नाक आणि तोंड आपल्या दुमडलेल्या कोपराने किंवा टिश्यूने झाकून टाका.

#आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास घरी रहा.

#आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या.

#रील गोष्टींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन गुगल कडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.