Use Sanitizer Knowingly: सध्या ‘काही’ प्रसंगी सॅनिटायझर ऐवजी साबण वापरा

Use Sanitizer Knowingly: Currently use soap instead of sanitizer on 'some' occasions अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर लावून गणपतीची आरती किंवा नमस्कार करायला जाऊ नका. अल्कोहोल हे ज्वलनशील आहे.

एमपीसी न्यूज – विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला आता फक्त दोन दिवस उरलेले आहेत. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणारा हा गणराय सगळ्या विघ्नांचा नाश करणारा देखील असतो. यंदा न भूतो न भविष्यति असे करोनाचे संकट सगळ्या जगामध्ये थैमान घालत आहे. आजवर जे केले नाही ते करण्याची वेळ सगळ्यांवर आली आहे. ज्या स्वच्छतेच्या सवयी आपल्याला पूर्वी होत्या. त्या सध्याच्या धावपळीच्या काळात बाजूला पडल्या आहेत. कोरोना काळात आपण मुक्तपणे सॅनिटायझरचा वापर करत आहोत. पण हा वापर गणपती उत्सवाच्या काळात काही अपघातांना आमंत्रण देऊ शकतो.

खास करुन सॅनिटायझर लावून आगीजवळ गेल्यास त्यापासून अपाय होण्याची शक्यता आहे. कारण त्यात अल्कोहोल असते. आणि अल्कोहोल ज्वलनशील असते. त्यामुळे लगेच आग लागू शकते.

म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे की, अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर लावून गणपतीची आरती किंवा नमस्कार करायला जाऊ नका. अल्कोहोल हे ज्वलनशील आहे. शक्यतो ज्यांच्या घरी गणपती येतील त्यांनी त्या कालावधीत हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझर ऐवजी साबणाचा वापर करावा.

तसेच सॅनिटायझर लावून आरती किंवा कापूरारती घ्यायला जाऊ नये. त्यातील अल्कोहोलमुळे लगेच हात भाजण्याची शक्यता आहे. याकाळात आपल्याला स्वच्छतेच्या कोणत्याही मापदंडाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पण त्याचबरोबर सुरक्षितता राखणे देखील गरजेचे आहे.

त्यामुळे या वरकरणी दिसायला छोट्या असणा-या गोष्टी अपघाताला आमंत्रण देऊ शकतात याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा हेच सर्वांना आवाहन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.