Patanjali: ‘अर्जात कोरोनाचा उल्लेख नव्हता, पंतजलीला ताप-खोकल्याच्या औषधाची दिली होती परवानगी’

Uttarakhand Ayush Ministry issues notice to Baba Ramdev's Patanjali over Coronil medicine राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी रामदेव बाबा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनावरील औषध ‘कोरोनिल’ औषध तयार केल्याचा दावा करणाऱ्या पंतजलीसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राजस्थान सरकारने रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. तर उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस बजावली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आयुर्वेदिक औषध तयार करण्याची परवानगी कोठून मिळाली, अशी विचारणा या विभागाने केली आहे.

उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्याच्या मते, पतंजलीच्या अर्जावर आम्ही परवाना दिला आहे. या अर्जात कुठेही कोरोना विषाणूचा उल्लेख नव्हता. यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे, कफ आणि तापावरील औषध तयार करण्याचा परवाना मागितला होता. विभागाकडून आता पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली आहे.

औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 च्या अधिनियम 170 नुसार कोणत्याही कंपनीला उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी परवाना देणाऱ्या विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. विभागाच्या परवानगीशिवाय कोरोनावर उपचाराचा दावा करणे वैध नाही.

दुसरीकडे राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी रामदेव बाबा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, जर त्यांचे औषध राजस्थानात विकत असल्याचे आढळल्यास त्याच दिवशी ते तुरुंगात असतील.

बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात रामदेवबाबा व सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, रामदेव बाबांनी आपल्या औषधाची घोषणा कोणत्याही मंत्रालयाच्या परवानगीशिवाय करणे योग्य नव्हते. आम्ही त्यांना उत्तर मागितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.