Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, 3 मृतदेह सापडले अनेकजण बेपत्ता

एमपीसी न्यूज – उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळला आहे. धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं असून, नदीकाठावरील घराचं तडाखा बसला आहे.

या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भिती वर्तविली जात आहे. आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून, अनेकजण बेपत्ता आहेत.

उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी (दि.7) सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. जोशी मठ परिसराजवळच ही घटना घडली असून, हिमस्खलन झाल्यानं ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर गंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील
धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पुल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदत कार्य सुरू केले आहे. पुरामध्ये 100 ते 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. ITBP, SDRF व NDRF च्या टिम घटनास्थळी पोहोचल्या असून, बचावकार्य सुरू आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.