Uttarakhand News : ‘ही’ मुलगी एक दिवसासाठी बनणार उत्तराखंडची मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज: 24 जानेवारी हा दिवस भारतात (India) ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ ( National Girl Day) म्हणून साजरा केला जातो. कन्या दिनाच्या निमित्ताने हरिद्वारच्या( Haridwar) सृष्टी गोस्वामीला ( shristhi Goswami)  एका दिवसासाठी मुख्यमंत्री (chief Minister) बनण्याची संधी देण्यात आली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत ( Uttarakhand Cm Trivendra snigh Rawt) यांनी याला मान्यता दिली आहे. डेहराडूनमध्ये होणा-या बाल विधानसभेमध्ये सृष्टी मुख्यमंत्री बनणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या एका दिवसात सृष्टी त्रिवेंद्र सिंह सरकारच्या विविध योजनांची माहिती घेणार असून बालिकांच्या सुरक्षेसंदर्भात काही सूचनादेखील करणार आहे. या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी आपापल्या योजनांबाबत 5-5 मिनिटांचे सादरीकरण करणार आहेत.

हा कार्यक्रम बाल विधानसभा भवनामध्ये दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान होणार आहे.

ही बाल विधानसभा तीन वर्षांतून एकदा भरवली जाते. दर तीन वर्षांतून एका बालकाला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळते. यावर्षी ही संधी मिळालेली सृष्टी बीएस्सी ॲग्रिकल्चरची विद्यार्थीनी आहे. तिच्या वडिलांचे छोटे दुकान असून तिची आई अंगणवाडी कार्यकर्ती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.