Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगांरांची अखेर 17 दिवसांनी सुटका

एमपीसी न्यूज : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे (Uttarkashi Tunnel Rescue) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना अखेर 17 दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात आले. बोगद्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. 800 मिमी व्यासाचा पाइपही टाकण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम पाईपद्वारे कामगारांपर्यंत पोहोचली. या टीमने कामगारांना पाईपद्वारे बाहेर काढण्यासाठी मदत केली. बचाव पथकाने कामगारांच्या नातेवाईकांना कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले होते. आता कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्वरित त्यांना रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात एकूण 41 कामगार अडकले होते. गेले 17 दिवस त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. (Uttarkashi Tunnel Rescue) मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्यातून कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यापूर्वी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान बोगद्याच्या आत गेले होते. ज्यामध्ये एका वृद्ध कामगाराला प्रथम बाहेर काढण्यात आले. या आधी 15 कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आले होते.

12 नोव्हेंबरच्या पहाटे कडाक्याच्या थंडीत उत्तरकाशीत कामगार बोगदा खणत असताना मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि 41 कामगार अडकले होते. तेव्हापासून आज 17 दिवस एनडीआरएफची टीम विविध मार्गाने कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. अखेर या बचाव कार्याला आज यश आले.

Ravet : गॅस एजन्सीची पाऊण कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थान पोलिसांकडून अटक

या बचाव कार्यात नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NHIDCL), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP-Indo Tibetan Border Police) यासह विविध एजन्सी सहभागी आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.