Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमध्ये सुखरूप बाहेर आलेल्या कामगारांचे पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक

एमपीसी न्यूज : : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे (Uttarkashi Tunnel Rescue) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना अखेर 17 दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात आले. या बचाव कार्यामध्ये मिळालेल्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून कौतुक केले आहे.  

पंतप्रधान मोदी म्हणाले, की उत्तरकाशीतील आमच्या कामगार बांधवांचे बचाव कार्याचे यश हे सर्वांनाच भावूक करणारे आहे.
बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो, की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देणारे आहे. मी तुम्हा सर्वांच्या कौशल्याचे आणि चांगल्या आरोग्य मिळावे यासाठी इच्छा व्यक्त करतो.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात (Uttarkashi Tunnel Rescue) या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांच्या धैर्याला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी मिळाली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण जगासमोर ठेवले आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share