Pimpri : इंद्रायणीनगरमध्ये व्हीव्ही पॅट मशीनबाबत जनजागृती

ऐनवेळी मतदारांचा गोंधळ उडू नये म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजन

एमपीसी न्यूज – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 207 भोसरी विधानसभा मतदारसंघातील इंद्रायणी नगर प्रभाग क्रमांक 8 येथील सेक्टर नंबर 1 ज्ञानेश्वरी मार्ग वैष्णव माता मंदिर परिसरात व्ही.व्ही.पॅट (मतदार सत्यपीठ पेपर ऑडिट मार्ग) बाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान हे मशीनवर बटन दाबून करण्यात येत आहे; परंतु यामध्ये सत्ताधारी पक्ष फेरफार करत असल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षाकडून अनेक वेळा केला आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला. त्यामुळे व्हीव्ही पॅट माध्यमातून मतदारांना आपण मतदान कोणाला केले आहे? याची पुराव्यानिशी खात्री व्हावी, यासाठी ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्यावतीने राबविली जात आहे. नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या पुढाकाराने या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आपण ज्या उमेदवाराला मतदान केले आहे ते 7 सेकंद एवढ्या वेळेत ज्या उमेदवाराच्या चिन्हसमोरील बटन दाबले आहे, त्याची प्रिंट होऊन त्या मशीनच्या पडद्यावर दिसणार आहे. त्यानंतर ही पावती प्रिंट कट होऊन याच मशीनमध्ये त्याची साठवणूक करण्यात येणार आहे.

सध्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्याबाबत मतदारांचा गोंधळ उडू नये, त्यासाठी निवडणूक आयोगाने हे जनजागृती अभियान हाती घेतले आहे. त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघात 8 जानेवारीपासून हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्ही.व्ही.पॅट मशीनसह निवडणूक कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक प्रभागात ज्याठिकाणी गर्दी आहे तेथे, शाळा, सोसायट्यामध्ये जाऊन याबाबत जनजागृती करत आहेत. हे अभियान भोसरी विधानसभा मतदारसंघात 20 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.