Vaalvi Movie : ‘वाळवी’ एक विक्षिप्त आणि तितकीच रोमहर्षक अन आकर्षक ही ….

एमपीसी न्यूज – कधी कधी असलेल्या जवळच्या (Vaalvi Movie) नात्यांना त्याच्या जुन्या होण्याच्या जाणीवेने आणि नवी नाती निर्माण होण्याच्या आशेने जर त्या नात्याला वाळवी लागली. तर काय काय होऊ शकत? ह्या अशा किचकट विषयाला अगदी सोपे करून जर कुणी दाखवले असेल तर ते म्हणजे परेश मोकाशी दिग्दर्शित “वाळवी” हा चित्रपट.

एक गुन्हा करायचा आणि जुने नाते संपवून टाकायचे. याची कृती एक असमाधानी जोडपे करू पाहते. त्यात एक तयार झालेले नवे नाते त्या गुन्ह्यात मदत करते. आणि मग सुरु होतो गुन्ह्यांचा मनोरंजक खेळ. एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा गुन्हा झाकण्यासाठी पुन्हा तिसरा गुन्हा असे होतच राहते.

त्यात पुन्हा अजून एक त्या जोडप्यापैकी एकाचे अजून एक नवे नाते. ते ही आपला गुन्हा लपवण्यासाठी प्रयत्न करत असतेच. गुन्हा लपवण्याच्या या चाललेल्या खेळात तो हो सामील होतो . मग एकत्र पणे सुरू होतो लपवालपवी चा जीवघेणा खेळ. आणि तो संपत असतानाच, त्याचा शेवट होतोय असे वाटत असतानाच त्याच वाळवी कडून आलेला धक्का आणि झालेला शेवट. हीच वाळवी ची गोष्ट.

खरतर एवढ्या अवघड असलेल्या सिनेमात कलाकारांची कामे उत्तम च व्हायला लागतात. या चित्रपटात सर्वच अभिनेत्यांनी जान आणली आहे. कुणीही आपल्या भूमिकेवरची पकड सोडली नाहीये ना संयम गमावलेला नाही . विनोदी चित्रपटात विनोदी अभिनयाचा अतिरेक होण्याची शक्यता असते .

Maharashtra Politics : महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र; अखेर युती झालीच!

या चित्रपटात गंभीर आणि प्रसंगानुरूप अभिनय सगळ्यांचाच झाला आहे . शिवानी सुर्वे, सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, नम्रता आवटे-संभेराव.यांनी सगळ्यांनीच मजा आणली आहे . तसेच या चित्रपटाच संकलन अभिजित देशपांडे आणि सौरभ प्रभुदेसाई यांनी केलय.मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहे, तर, हा सिनेमा लिहिला आहे ख्यातनाम लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी.

मधुगंधा कुलकर्णी या चित्रपटाच्या निर्मात्याही आहेत . तर सत्यजित शोभा श्रीराम यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण अगदी चपखल केले आहे . एकूण हा चित्रपट बघताना रसिकांना मजा येते. हा सिनेमा एक अनुभव आहे. आणि तो आपण प्रत्येकाने एकदा तरी थियेटरमध्ये जाउनच घ्यायला हवा.

(विशेष उल्लेख: अनिता दाते- केळकर यांच्याशी संबंधित प्रसंग बघताना “जाने भी दो यारो” ह्या चित्रपटातील सतीश शहा यांनी साकारलेल्या भूमिकेची आठवण अनिता दाते यांनी करून दिली आहे . ) एक वेगळीच धम्माल अनुभवायला वाळवी सिनेमा पाहायलाच हवा.

  –लेखक : हर्षल विनोद आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.