Pimpri News : अगोदर आपल्या नागरिकांना लस द्या, नंतर इतर देशांना पुरवा – गजानन बाबर 

एमपीसी न्यूज – भारत सरकारने आपल्या देशातील नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न करावेत. देशात निर्माण होणारी लस सर्वप्रथम भारतात वापरून नंतर उर्वरित देशांना पुरवली जावी. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर देखील सरकारने नियंत्रण ठेवावे असे मत मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांनी व्यक्त केले आहे. 

बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य सचिव यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. आपल्या पत्रात बाबर म्हणतात, ‘सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्या लस उत्पादनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कोरोनाच्या दुसरी लाटेने देशात शिरकाव केला असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यानुसार सरकारने योग्य पाऊलं उचलली पाहिजेत.’

‘भारतात निर्माण होणाऱ्या लसींचा वापर आपल्या देशातील नागरिकांसाठी प्राधान्यानेे केला पाहिजे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला प्रत्येक आठवड्याला 20 ते 25 लाख लशीचे डोस पुरवण्याची गरज आहे.’ असं बाबर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.