Pune Vaccination : लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण, पुण्यात वर्षभरात 65 लाख डोसचे लसीकरण

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधीत लसीकरणास 16 जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभराच्या कालावधीत शहरात 65 लाख 3 हजार 781 लस नागरिकांना देण्यात आल्या आहेत. पहिल्या डोसचे उद्दीष्ठ पूर्ण झाले असून दुसर्‍या डोसचे उद्दीष्ठ 85 टक्के पूर्ण झाले आहे. याच लसीकरणामुळे आज कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची तिव्रता कमी दिसत आहे.

कोरोनाचे प्रतिबंधीत लसीकरण शहरात 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाले. यामध्ये सर्वप्रथम शासकीय आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारी पासून फ्रंटलाईन वर्कर्सचे, 1 मार्चपासून 65 वर्षांवरील नागरिकांचे, 1 एप्रीलपासून 45 वर्षांपुढील नागरिकांचे आणि 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू झाले. तर 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर व सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक यांना तिसरा डोस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने 18 वर्षावरील 33 लाख नागरिकांचे व 15 ते 18 वर्षावरील अडीच लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. लसीकरणाच्या वर्षभराच्या या प्रवासात 36 लाख 71 हजार 879 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे पहिला डोस देण्याचे प्रशासनाचे 100 टक्के उद्दीष्ठ पूर्ण झाले आहे. तर दुसरा डोस 28 लाख 13 हजार 248 नागरिकांनी घेतल्याने दुसर्‍या डोसचे 85 टक्के उद्दीष्ठ पूर्ण झाले आहे. तर 15 ते 18 वर्षापर्यंतच्या 55 हजार 605 मुलांनी पहिला डोस घेतला आहे. तसेच 18 हजार 654 जणांना तिसरा बुस्टर डोस देण्यात आल्याची माहिती महिपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
———————————
लसीकरणाची आकडेवारी

कर्मचारी व नागरिक – पहिला डोस – दुसरा डोस – तिसरा डोस
आरोग्य कर्मचारी   – 63,270 – 65702 – 7488
फ्रंटलाईन वर्कर – 95659 – 92854 – 4819
65 वर्षावरील नागरिक – 486562 – 426586 – 6347
45 ते 60 वर्षे – 642701 – 544802 – —
18 ते 45 वर्षे – 2318082 – 1683304 – —
15 ते 18 वर्षे – 55605 – — – —

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.