Pimpri News :लसीअभावी भाजपच्या ताब्यात असलेल्या पालिकेचे लसीकरण केंद्रे बंद; रोहित पवार म्हणतात…

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने पिंपरी- चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व लसीकरण केंद्रे आज (शुक्रवारी) बंद ठेवली आहेत. तसे पत्रक महापालिकेने काढले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत म्हटले आहे.

आपल्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या #pcmc ने काढलेल्या या पत्रावर तरी भाजपने विश्वास ठेवावा आणि महाराष्ट्राला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी! केंद्र सरकार याबाबत सहकार्य करेल, असा विश्वास आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात कोरोना लसीचा तुटवडा आहे.

 

महापालिकेकडे केवळ 15 हजार लसीचे डोस शिल्लक होते. हे लसीचे डोस गुरुवारी दुपारीच संपले. दुपारनंतर अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली. नागरिकांना लस नसल्याने लस न घेताच परत जावे लागले. त्यानंतर रात्री उशीरा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने लसीचा साठा उपलब्ध नसल्याने आज शुक्रवारी सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तो धागा पकडत  आणि महापालिकेचे लसीकरण नसल्याने केंद्रे बंद ठेवल्याचे पत्रक कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. आपल्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या #pcmc ने काढलेल्या या पत्रावर तरी भाजपने विश्वास ठेवावा आणि  महाराष्ट्राला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी! केंद्र सरकार याबाबत सहकार्य करेल, असा विश्वास आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट पीएमओ, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना टॅग केले आहे. तसेच maharashtra needs vaccine  हा हॅशटॅग वापरला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.