Corona Vaccination : कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस महाराष्ट्रातील लसीकरण रद्द

एमपीसी न्यूज : कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आज, उद्या (दि.17 ते 18) दोन दिवस महाराष्ट्रातील लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. 

सोमवारीही लसीकरण होण्याची शक्यता देखील कमी आहे. ऑफलाईन माध्यमातून नोंदणी करुन लसीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

दरम्यान, शनिवारी राज्यातील 285 केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय लसीकरणाचा शुभारंभ झाला. दिवसभरात 18 हजार 338 हून अधिक (सुमारे 64 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.