Pune News : झोपडपट्ट्यांमधील लसीकरणास पालिकेकडून सुरुवात 

एमपीसी न्यूज : महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेने वस्तीपातळीवर जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारपासून या लसीकरण मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

आगामी काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची रणनीती पालिकेने आखली आहे. कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्यात येणार आहे. तसेच शहरातील पालिकेच्या विविध लाईट हाऊसमध्ये झोपडपट्ट्यांमधील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. शहरात ३९२ झोपडपट्ट्या आहेत. या वस्त्यांमधील नागरिकांना ऑनलाईन स्लॉट बुकिंग

करताना येणाऱ्या समस्या दैनंदिन प्रश्न यामुळे थेट त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या प्रशासनानेही मान्यता दिलेली आहे. मंगळवारपासून पालिकेच्या लाईट हाऊसमध्ये या लसीकरणास प्रारंभ झाला.मात्र लसींचा पुरवठा न झाल्याने बुधवारी गुरुवारी हे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.