Corona vaccine : आगाऊ नोंदणी केली तरच लस मिळेल !

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना येत्या १ मेपासून कोरोना लस देण्यात येणार आहे मात्र लस घेण्यासाठी त्यांना खासगी केंद्रांवर जावे लागणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

यासाठी लोकांना को-विन ॲपवर नावाची आगाऊ नोंदणी करावी लागेल, लस घेण्याची वेळ व दिवस निश्चित केला जाईल. ही प्रक्रिया पार न पाडता थेट येणाऱ्यांना लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

देशात १४ कोटीहून अधिक नागरिकांना लस दिली आहे. ॲपवर नावनोंदणी न करता थेट केंद्रावर लस घेतलेल्याने एकूण संख्या वाढण्यास मदत झाली. शनिवारपर्यंत ६८ टक्के लोकांनी ॲपवर नाव न नोंदविता थेट केंद्रावर जाणे पसंत केले. तर ११.६ टक्के लोकांनी ॲपवर नावनोंदणी केली होती. त्याशिवाय डॉक्टर, आरोग्यसेवक व कोरोना योद्ध्यानाही लस घेण्यासाठी को-विन ॲपवर आपली नावे नोंदविली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.