Vaccination News : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी 45 प्लस वयोगटातील नागरिकांना 56 केंद्रांवर कोविशील्ड तर 03 केंद्रांवर कोवॅक्सिन लस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 10) 56 लसीकरण केंद्रांवर कोविशील्ड लस तर तीन केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन नोंदणी करून नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे.

तीन केंद्रांवर 45 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना 160 नागरिकांच्या क्षमतेने लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तर 56 केंद्रांवर 100 लाभार्थ्यांच्या क्षमतेने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. तसेच आठ लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. या केंद्रांवर 200 नागरिकांच्या क्षमतेने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तर

नागरिकांना लस घेण्यासाठी  http://www.cowin.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करून Appointment घेणे बंधनकारक आहे. Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत लस केंद्रांवर जाऊन लस घ्यावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सोमवारी खुली असणारी लसीकरण केंद्र –
# नवीन भोसरी रुग्णालय (कोविशील्ड लस)
# नवीन जिजामाता रुग्णालय (कोविशील्ड लास)
# प्रेमलोकपार्क दवाखाना (कोविशील्ड लस)
# यमुनानगर रुग्णालय (कोवॅक्सिन लस)
# डोळ्यांचे हॉस्पिटल – मासुळकर कॉलनी (कोवॅक्सिन लस)
# पिंपळे निलख पीसीएमसी स्कुल (कोवॅक्सिन लस)
# नवीन आकुर्डी रुग्णालय (कोवॅक्सिन लस)
# अहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी (कोवॅक्सिन लस)

45 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी सोमवारी 160 लाभार्थ्यांच्या क्षमतेने खुली असणारी लसीकरण केंद्र –
# सावित्रीबाई फुले शाळा भोसरी (कोवॅक्सिन लस)
# नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी (कोवॅक्सिन लस)
# तालेरा रुग्णालय (कोवॅक्सिन लस)

वरील तीन केंद्राव्यतिरिक्त इतर 56 लसीकरण केंद्रांवर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 100 लाभार्थ्यांच्या क्षमतेने लसीकरण होणार आहे. 45 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.