Vaccination News : देशात लसीकरणाचा नवा उच्चांक, दिवसभरात एक कोटी लोकांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना लस घेण्याचे प्रमाण वाढले असून, आज (मंगळवारी, दि.31) दिवसभरात एक कोटीहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. देशात आज 1.04 कोटी नागरिकांनी लस घेतली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज 1 कोटी 04 लाख 42 हजार 184 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 65 कोटी 12 लाख 14 हजार 767 जणांनी लसीचा डोस घेतला आहे. त्यापैकी 15 कोटी 03 लाख 10 हजार 838 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असून, 50 कोटी 09 लाख 03 हजार 929 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

दुसरीकडे, देशात सध्या 3 लाख 76 हजार 324 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 38 हजार 560 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. तर, देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.53 टक्के एवढा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.