Vaccination News : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी विक्रमी लसीकरण, आज 2 कोटी 21 लाख लसीकरण

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आज (शुक्रवारी) साजरा केला जात आहे. मोदींच्या वाढदिवशी देशात विक्रमी लसीकरण झाले असून दिवसभरात लसीकरणाने दोन कोटी 21 लाखपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली असल्याने लसीकरण वाढल्याचे बोलले जात आहे.

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. याअंतर्गत आत्तापर्यंत 77 कोटीहून अधिक लोकांना लस घेतली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस साजरा होत असताना ठिकठिकाणी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. याचाच परिणाम म्हणून आज सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत 2 कोटी 21 लाख 87 हजार 241 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ही आजवरची एका दिवसांतील लसीकरणाची उच्चांकी आकडेवारी आहे.

देशात गुरूवारपर्यंत (दि.16) 77 कोटी 24 लाख 25 हजार 744 जणांचे लसीकरण झाले होते. आजच्या लसीकरणासह एकूण लसीकरणाची संख्या 79.50 कोटीच्या जवळ गेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.