Vaccination News : महाराष्ट्रात दोन कोटी लसीकरणाचा टप्पा पार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याने कोरोना लसीकरणाचा दोन कोटींचा टप्पा पार केला असून, लसीकरणात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. सोमवारी (दि.17) राज्यात 99 हजार 699 जणांना लस टोचण्यात आली. यासह राज्यात 2 कोटी 90 हजार 308 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

राज्याने लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, राज्यात लसीचा तुटवडा असल्याने 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. 45 वर्षांवरील नागरिक तसेच दुसऱ्या डोस देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी सांगितले होते.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 18 कोटी 44 लाख 53 हजार 149 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. कोटी 24 लाख 03 हजार 852 नागरिकांना पहिला डोस तर, 4 कोटी 20 लाख 18 हजार 366 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.