Vaccination News : राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, कॅबिनेट बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली यामध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं.

_MPC_DIR_MPU_II

दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे आदर पुनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 मे नंतर राज्याला दीड कोटी कोव्हीशिल्ड लसीचे डोस देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल असे आरोग्यमंत्री म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.