India Corona Update : देशात 10.43 लाख जणांचे लसीकरण, 24 तासांत 14,545 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जात आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आतापर्यंत 10 लाख 43 हजार 534 जणांना लस टोचण्यात आली आहे. दुसरीकडे देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 545 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 06 लाख 25 हजार 428 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 02 लाख 83 हजार 708 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 88 हजार 688 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

 

देशात आजवर 19 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 01 लाख 48 हजार 24  नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 242, नमून्यांची तपासणी गुरुवारी (दि.20) करण्यात आली आहे.

 

 

गेल्या 24 तासांत देशभरात 18 हजार 2 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट रिकव्हरी रेट 96.78 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 162 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 52 हजार 718 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.