Vadgaon Maval News : मावळ तालुक्यातील Covid-19 चे लसीकरण सरकारी व खाजगी रुग्णालयात सुरू

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात कोविड 19 लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुस-या टप्प्यात नागरिकांसाठी खासगी रूग्णालयांमध्येही लसीकरण बुधवार (दि 3) पासून सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे. तहसीलदारांनी स्वतः लस घेऊन लसीकरण मोहिमेला सुरुवात केली व नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले. 

2 मार्च पर्यंत तालुक्यात 5 हजार 983 लाभार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झालेले आहे. त्यापैकी कोणालाही लसीकरणामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. पात्र लाभार्थ्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण करून घेणे फायदेशीर आहे. असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे,वैद्यकीय अधीक्षक डाॅ जयश्री ढवळे यांनी केले.

16 जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशभरात covid-19 लसीकरण सुरू करण्यात आले होते. सुरुवातीच्या प्रथम टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 01 मार्च 2021 पासून देशभरात सामान्य नागरिकांसाठी देखील लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे .त्यानुसार मावळ तालुक्यात देखील 1 मार्च 2021 पासून 45 ते 59 या वयोगटातील मधुमेह,उच्चरक्तदाब असणारे व्यक्ती तसेच 60 वर्षापुढील सर्व व्यक्तींसाठी लसीकरण सुरू झाले आहे.

HCW- शासकीय आणि खासगी सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ, आशा,अंगणवाडी सेविका, मदतनीस.

FLW- पोलिस,महसूल, तलाठी,NDRF,CRPF, नगर परिषदेचे कर्मचारी

PRI- पंचायत समिती स्तरावरील सर्व स्टाफ उदा.ग्रामसेवक,शिक्षक,बांधकाम विभाग,पशुधन विभाग स्तरावरील सर्व स्टाफ दुस-या टप्प्यासाठी पात्र लाभार्थी असणार आहेत.

सामान्य नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी प्रक्रिया 

cowin.gov.in या website

 किंवा आरोग्य सेतु app किंवा co-win app ला जाउन स्वत: नोंदणी करणे.

 लसीकरण केंद्रावर जाउन त्याच ठिकाणी नोंदणी करून लगेच लसीकरण करणे अशी प्रक्रिया असून निश्चित केलेल्या   दराप्रमाणे म्हणजे 250 रूपये प्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.

 HCW, FLW, PRI यांच्यासाठी नोंदणी प्रक्रिया 

ज्या  HCW, FLW, PRI कर्मचारी यांचे वय 45 ते 59 आहे परंतु इतर कोणताही आजार नाही त्यांनी तसेच ज्या व्यक्तीचे वय 45 पेक्षा कमी आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर जाउन त्याच ठिकाणी नोंदणी करून लगेच लसीकरण करणे.

लसीकरण कोठे चालू आहे :

शासकीय रुग्णालय

_MPC_DIR_MPU_II

1)ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे फाटा

2)प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे

3)प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला 4)प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे

5)प्राथमिक आरोग्य केंद्र आढले

सर्व शासकीय केंद्रांवर लसीकरण हे निशुल्क केले जाणार आहे कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.

खाजगी रुग्णालय

1) पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा

2)  पायोनियर हॉस्पिटल सोमाटणे फाटा

3)अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे 4)भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय ,मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे

5)संजीवनी हॉस्पिटल लोणावळा

लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे

1) शासकीय कर्मचारी असल्यास कार्यालयाचे ओळखपत्र

2) आधार कार्ड, पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन, पेन्शन प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक चालेल

3) 45 ते 59 वयोगटातील व्यक्तींनी कोणताही आजार असल्यास त्याबाबतचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र सोबत आणावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.