Talegaon Dabhade : तिसऱ्या महालसीकरण मोहिमेत आठ हजार जणांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरात कोरोना प्रतिबंध महालसीकरणाची तिसरी मोहीम शुक्रवारी (दि. 24) पार पडली. या मोहिमेत तळेगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लस घेण्यासाठी शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर प्रचंड रांगा लागल्या होत्या. एक दिवसात सुमारे 8 हजार 2 नागरिकांनी लस घेतली.

लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आमदार सुनील शेळके यांनी आभार मानले. तळेगाव स्टेशन येथे जनसेवा विकास समिती आणि तळेगाव गाव परिसरात लायन्स क्लब व अन्य संस्थांनी लाभार्थ्यांना चहा, पाणी, नाष्ट्याची व्यवस्था केली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय, वडगाव मावळ यांचेमार्फत शहरात 19 ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर नगरपरिषदेमार्फत एक डॉक्टर’, 2 नर्स’, 2 डाटा एंट्री ऑपरेटर, 2 नोंदणी अधिकारी, दोन संगणक व इंटरनेट सुविधा  ठेवण्यात आल्या होत्या.

         

या अभियानात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, तालुका वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत लोहारे, तालुका समन्वयक डॉ. गुणेश बागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.उन्मेष गुट्टे, डॉ. मिलिंद सोनवणे, डॉ.इंद्रणील पाटील, डॉ. दिनेश महालंगे, डॉ, जयश्री ढवळे, याबरोबर नर्सेस, आशासेविका,  ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस कर्मचारी, लायन्स क्लबचे, इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आदींनी नियोजनात सक्रीय सहभाग घेतला होता.

या महालसीकरण अभियानातील लसीकरण केंद्राला आमदार सुनिल शेळके, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे,गटनेत्या सुलोचना आवारे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, विरोधी पक्षनेते गणेश काकडे,नगरसेवक गणेश खांडगे, संतोष भेगडे,अरुण माने, निखिल भगत,अमोल शेटे, आनंद भेगडे, विशाल दाभाडे, लायन्स क्लबचे डिस्टिक गव्हर्नर दीपक शहा,अध्यक्ष दीपक बाळसराफसह आजी-माजी नगरसेवक. राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी भेटी दिल्या

” तळेगाव दाभाडे येथे आयोजित केलेल्या महालसीकरण अभियानामध्ये डॉक्टर, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, पदाधिकारी, नर्सेस, आशासेविका, स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले स्वयंसेवक या सर्वांचं आमदार सुनील शेळके यांनी लायन्स क्लब येथे आभार मानले”

‘लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची, चहा, पाण्याची, नाष्ट्याची व्यवस्था तळेगाव स्टेशन परिसरामध्ये जनसेवा विकास समितीच्यावतीने तर गाव भागांमध्ये लायन्स क्लब व अन्य संस्थांच्या माध्यमातून काही सठिकाणी करण्यात आली होती. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.