Anti Covid Vaccine Campaign : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण 

0

एमपीसी न्यूज : देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात वय वर्षे 50 हून अधिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. नियोजनानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नियोजित वेळापत्रकानुसार ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणामध्ये पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या तीन टप्पात आरोग्य विभागातीस डॉक्टर, नर्सेस, लॅब टेक्नॉलॉजीस्ट, पॅथोलॉजीस्ट आणि अन्य कर्मचारी यांना लसीकरण केले जात आहे. पहिल्या डोस नंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिले जात आहे. अद्याप फ्रंट लाईन वर्कर्स यांना पहिला डोस देण्यात आलेला नाही.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान कोविन अॅपमधील लसीकरण नोंदणी, दुबार तिबार नावांचा गोंधळ, रुग्णालयांकडून डेटा अपलोड न करणे, लाखो व्हिजीट्स मुळे अॅप आणि संकेतस्थळ हँग होणे अशा अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठीचे लसीकरण मार्च महिन्यात सुरू होईल अशी शक्यता पुणे महापालिकेेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी वर्तवली.

दरम्यान महापालिकेच्या 11 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. फ्रंट लाईन वर्कर्स म्हणजे नेमके कोणकोणत्या क्षेत्रातील व्यक्ती याचे लेखी स्पष्टीकरण केंद्राकडून न आल्यामुळे लोकप्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींना लसीकरण करावे की नाही याबाबत अद्यापही साशंकता आहे. एकूणच कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना लसीकरण मोहीम मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय दिरंगाईच्या कात्रीत सापडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.