Coronavirus Update : कोरोनावरील Sputnik V’ च्या लसीकरणाला रशियात सुरवात

एमपीसी न्यूज :  कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशातच अंतिम टप्प्यात अनेक लसींची चाचणी आहे. मात्र सर्वात आधी कोरोनावरील प्रभावी लस ‘Sputnik V’ तयार केल्याचा दावा रशियाने केला होता. रशियाने आता लसीकरणालाही सुरुवात केली आहे.

रशियाने कोरोना लसीच्या लसीकरणात आघाडी घेतली आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला रशियामध्ये सुरुवात झाली असून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये ‘Sputnik V’ या रशिया निर्मीत कोरोना लसीचा डोस देण्यात येत आहे. डॉक्टर, आरोग्यसेवक अशा हायरिस्क वर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे. मॉस्कोमध्ये शनिवारी लसीकरणासाठी 70 लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियामध्ये लसीकरण करताना ज्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. अशा लोकांना प्राधान्य दिले जात आहे. Sputnik V लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. तसेच या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत.

दरम्यान, लसीचे सकारात्मक परिणामांनंतरही सामूहिक परीक्षण अद्याप सुरु आहे. हजारो लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मॉस्कोचे मेयर संगेई सोबयानिन म्हणाले की, शाळेतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आमि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ही लस सर्वात आधी उपलब्ध करण्यात येईल. सर्व रुग्णांना 21 दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.