Vaccination Registration : आज दुपारी चार नंतर अठरा वर्षांवरील नागरिकांची लसीकरण नोंदणी सुरु

 'अशी करा नोंदणी' 

एमपीसी न्यूज – देशात एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्वजण कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असतील. लसीसाठी 18 ते 45 वयोगटातील सर्वांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. लसीकरण नोंदणीसाठी आज (बुधवार, दि.28) दुपारी चार वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. थेट रुग्णालयात जाऊन नोंदणी करता येणार नाही. 

लस घेण्यासाठी पात्र असलेल्या 18 वर्षांवरील नागरिकांना cowin.gov.in, आरोग्य सेतू व उमंग मोबाईल ॲपच्या मदतीने नोंदणी करता करता येईल. एक मे रोजी राज्य सरकार व खासगी लसीकरण केंद्रावर लसीच्या उपलब्धतेनुसार अपॉइंटमेंट दिली जाईल. आज दुपारी चारनंतर नोंदणी सुरू होणार आहे.

देशात सध्या सिरम इंन्सिट्यूटची कोव्हीशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय रशियाच्या स्पुटनिकV लसीच्या आपात्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे.

अशी करा नोंदणी
– cowin.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका
– मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, ओटीपी संकेतस्थळावरील ओटीपी बॉक्स मध्ये टाकून व्हेरिफाय करा
– यानंतर रजिस्ट्रेशनची विंडो ओपन होईल

– रजिस्ट्रेशनची विंडो मध्ये आपली माहिती टाकून ओळखपत्र व्हेरिफाय करा
– आपल्याला असलेल्या सहव्याधी बाबत माहिती द्या (उदा. शुगर, बीपी, अस्थमा इ.)
– सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करा
– नोंदणी पूर्ण झाल्या नंतर समोर तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल
– यानंतर अपॉइंटमेंटसाठी तारीख आणि लसीकरण केंद्र निवडावे
दरम्यान, एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्वांना लस टोचण्यात येणार आहे. मात्र, लसीच्या उपलब्धतेवरुन शंका व्यक्त केली जात आहे. तसेच, दुसरा डोस असणा-या नागरिकांच्या गैरसोयीबाबत मतमतांतरे आहेत. याशिवाय लसीच्या किंमती यावरून वाद निर्माण झाला आहे. 1 मे पासून महाराष्ट्रासह इतर राज्यात सगळ्यांचं लसीकरण सुरू होईल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.