Covishield, Covaxi, Sputnik-V चे कमाल दर निश्चित, Covaxin साठी मोजवे लगणार सर्वाधिक पैसे

एमपीसी न्यूज : देशातील खासगी रुग्णालयातील कोरोना लसींच्या सुधारित किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत.  कोरोना लसीवर सेवा शुल्क म्हणून खाजगी रुग्णालय जास्तीत जास्त १५० रुपये आकारु शकते. राज्य शासनाकडून त्यांच्या शुल्कांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

खासगी रुग्णालयातील सुधारित लसींच्या किंमतीत Covaxin लस सर्वात महाग आहे. देशात सध्या कोव्हॅक्सिन (Covacin) कोव्हिशिल्ड (Covishield) आणि स्पुतनिक व्ही (Sputnik V) या तीन लसींना मान्यता आहे. खासगी रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीसाठी ७८० रुपये मोजावे लागणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीसाठी १ हजार ४१० रुपये आकारले जाणार आहे. त्यानंतर स्पुतनिक व्ही लसीसाठी १ हजार १४५ रुपये आकारले जाणार आहे. यात कोव्हॅक्सिन लस सर्वात महाग आहे तर कोव्हिशिल्ड लसीची किंमत सर्वात स्वस्त ठेवण्यात आली आहे.

 

खासगी रुग्णालयातील कोरोना लसींच्या किंमतीवर ५ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. कोव्हिशिल्ड लसीवर ३० रुपये जीएसटी आकारण्यात आला आहे. तर कोव्हॅक्सिन लसीवर ६० रुपये आणि स्पुतनिक व्ही लसीवर ४७.४० – ४७ रुपये जीएसटी आकारण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांच्या लसींच्या डोसची किंमत प्रत्येक लस उत्पादकांकडून जाहीर केली जाईल आणि त्यानंतर कोणत्याही बदलाची सूचना देण्यात येईल.

कोविन वेबसाइटवर खाजगी कोरोना लसीकरण केंद्रावर सरकारने जाहीर केलेल्या लसींच्या किंमतींपेक्षा जास्त असू नये याची खात्री करावी. कोविन सिस्टम खाजगी लसीकरण केंद्राने जाहीर केलेली किंमती किमान मूल्यांपेक्षा जास्त असल्यास संबंधित लसींसाठी लसींच्या किमान मूल्यांवर रिसेट करेल. त्याचप्रमाणे लस उत्पादकांकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रति डोसच्या किंमती भविष्यात उत्पादक बदलू शकतात. त्यामुळे भविष्यात खासगी रुग्णालयात लसींच्या किंमतीत बदल केले जाऊ शकतात,असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी जाहीर केल्यानुसार देशातील लसींच्या उत्पादकांकडून ७५ टक्के लस भारत सरकार घेणार आहे. त्याचप्रमाणे देशातील विविध राज्यातील लसींचा २५ टक्के खर्चही सरकार करणार आहे. १८वर्षांवरील नागरिकांना सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार २१ जूनपासून लसीकरण करण्यात येणार आहे. भारत सरकार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत लस देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.