
Vaccine Testing : पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटयूट’ला ‘कोव्हिडशिल्ड’ लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी
या परवानगीमुळे लस निर्मितीच्या प्रक्रियाला वेग येणार आहे. ; Permission for serum institute in Pune for testing of second and third phase of covidshield vaccine

एमपीसी न्यूज – पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला आँक्सफर्ड विद्यापीठ-अँस्ट्रा झेनेकासोबत कोविड विरोधी ‘कोव्हिडशिल्ड’ या लसीच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे लस निर्मितीच्या प्रक्रियाला वेग येणार आहे.

भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांच्याकडून ही मंजुरी मिळाली आहे. जगभरात खळबळ माजवणाऱ्या कोरोना व्हायरसवर विविध देशांमध्ये लस तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
भारतात ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मदतीने पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट तयार करत आहे.
ही लस मोठ्या प्रमाणात तयार करणार असल्याचे सिरम इन्स्टिटयूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले.
#IndiaFightsCorona
Drugs Controller General of India has given approval to Serum Institute of India, Pune to conduct Phase II+III clinical trials of Oxford University-Astra Zeneca #COVID19 vaccine (COVISHIELD) in India.@PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @UniofOxford— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 3, 2020

सिरम इन्स्टिटयूट कंपनी ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे. ही लस एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वतीने तयार केली जात आहे.
सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून दररोज 50 हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. मात्र, रूग्ण कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
भारताच्या रुग्ण मृत्यू दरात आणखी घट झाली असून जगाच्या तुलनेत हा दर सर्वात कमी आहे. सध्या देशात 2.11 टक्के मृत्यू दर आहे. ‘टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट’ याच्या उत्तम आणि परीणामकारक कार्यवाहीमुळे देशातील मृत्यूदर कमी करणं शक्य झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
देशात काल दिवसभरात 40,574 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या 11,86203 इतकी झाली असून बरे होण्याचा दर 65.77% इतका झाला आहे.
दरदिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि प्रत्यक्ष रुग्ण यातील फरक 6 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. सध्या तो 6,06,846 इतका आहे. सध्या 5,79357 एवढे रुग्ण उपचाराधिन आहेत.
