BNR-HDR-TOP-Mobile

Vadagaon Maval : वणवा विझवण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश

183
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – वडगांव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमागील डोंगरातील लागलेला वणवा विझवण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश मिळाले. यामुळे डोंगर जळण्यापासून वाचला.

वडगांव मावळ येथील डोंगराला आग लागली होती. गेल्या चार दिवसांपासून डोंगरास आग लागत होती. आग धुमसत होती. अक्षय औताडे या तरुणाने प्रत्यक्षरित्या डोंगरावर जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. डोंगरास लागणा-या वणव्याबाबत वनखात्याच्या 1926 हेल्पलाईनवर संपर्क साधला. वणवा लागल्याची माहिती दिली.

वणवा विझवायला महिला कर्मचारी पोहचल्या. डोंगरातील लागलेल्या वणव्या वरती नियंत्रण आणण्याचे काम केले. विशाल शिंदे, अतुल वाघवले यांच्यासह आणखी दोन ग्रामस्थ वणवा विझवायला आले. त्यामुळे मनुष्यबळ वाढले. या सर्वांनी डोंगरात लागलेल्या वणवा विझविला. यामुळे डोंगर जळण्या पासून वाचवण्यात यश आले. कित्येक जिव वाचले. वणवा विझवण्यात वनविभागाच्या महिला कर्मचारी वनरक्षक सुनीता शिरसट, शकुंतला गोरे, विशाल शिंदे, अतुल वाघवले, अक्षय औताडे, किरण चिमटे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.