Vadgaon News : निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे बुधवारी (दि. 13 जाने.) निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजक विशाल वहिले, मंगेश खैरे, अतुल राऊत व आफताब सय्यद यांनी दिली.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी वडगाव शहरातील सुभाषराव जाधव यांची निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार व निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात बुधवारी सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हापरिषद सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे आदी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.