Ravet News : वडापाव विक्रेत्याला काठीने मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून वडापाव विक्रेत्याला काठीने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास किवळे येथे घडली. 

दत्ता तरस (रा. किवळे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरस हे किवळे येथील उड्डाणपुलाजवळ हातगाडीवर वडापाव विक्री करतात. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपींनी त्यांच्याकडून वडापाव घेतले. त्यावेळी पैशाच्या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी तरस यांना काठीने मारहाण केली. या प्रकरणी रात्री उशीरपर्यंत रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.