Vadgaon : आठवडे बाजारातून प्रतिबंधित 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

एमपीसी न्यूज – वडगाव शहरात पोटोबा मंदिराच्या प्रांगण परिसरात (Vadgaon) गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात वडगाव नगरपंचायतच्या पथकाने प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये प्रतिबंधित असलेल्या 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. मुख्य अधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

देशात प्लास्टिक’ (Single Use Plastic) वापरावर बंदी घातलेली असताना  शहरातील कचरा व्यवस्थापन करताना त्यामध्ये विघटन न होणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण मोठे आढळत असून त्याचा परिणाम कचरा जिरविण्यावर होत आहे या कारणास्तव वडगाव नगरपंचायतचे मुख्य अधिकारी डॉ प्रवीण निकम यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली आज वडगाव शहरातील आठवड्या बाजाराच्या दिवशी मुक्तपणे प्लास्टिकचा वापर करणाऱ्यावर वडगाव नगरपंचायत’ अ‍ॅक्शन मोडवर’ आली असून, शहरातील पथारी धारक,फळ व भाजी विक्रेते यांच्या वर छापा मारत कारवाई केली आहे.

Mahalunge : पेट्रोलचे पैसे न देता पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण

या प्रसंगी नगरपंचायत पथकाने शासनाने प्रतिबंधक असलेल्या जवळपास ३०किलो प्लास्टिक पिशव्या येथून जप्त केल्या एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे १-जुलै-२०२२ पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जर कोणी ‘सिंगल-युज प्लास्टिक’चा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक आणि त्यांनतर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. मात्र असे असताना शहरातील अनेक ठिकाणी ‘सिंगल-युज प्लास्टिक’चा खुलेआम वापर केला (Vadgaon) जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्यावतीने या विरोधात आता थेट कारवाई करायला सुरवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.