Vadgaon : मावळात आज दिवसभरात 30 रुग्ण पॉझिटिव्ह; उच्चांकी रुग्णवाढ

30 patients tested positive in Mawla today; High morbiditya; आज अखेर 30 जण कोरोनामुक्त

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून दिवसभरात 30 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तळेगाव, लोणावळा, सोमाटणे, वडगाव, पिंपळोली, शिळीम, गहुंजे, देवले येथील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

पिंपळोली, गहुंजे, वडगाव, शिळीम येथे प्रत्येकी एक रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर तळेगाव दाभाडे येथे 17, लोणावळा 05, तर सोमाटणे येथे 04 रुग्ण आढळले आहेत. असे एकूण 30 रुग्ण आज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णसंख्येचा तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्या खूप वाढलेली दिसते. आज अखेर 30 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्र. 7 मध्ये एकूण 6 रुग्ण, चिंतामणी रेसिडेन्सी म्हाळसकरवाडी येथील 6 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दि.14 रोजी याच कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झाली होती. नव्या रुग्णांमध्ये बाधित व्यक्तीची आई (वय 60), बहीण (वय 32), पुतणी (वय 8), पुतण्या (वय 4), मुलगा (वय 6 महिने), मेहुणी (वय 21) यांचा समावेश आहे.

तर प्रभाग क्र. 3 मधील रेनो कॉलनीमध्ये महिला (वय 27), स्वामी समर्थनगर मधील महिला (वय 48) यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  प्रभाग क्र. 6 मध्ये रेल्वे क्वार्टरमधील महिला (वय 55), पुरुष (वय 36) यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

प्रभाग क्र. 11 मध्ये शनिवार पेठ, खंडोबा मंदिर जवळील एका मुलाचा (वय 10) अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्रभाग क्र. 5 मध्ये शांताई नगर येथे पुरुष (वय 45), महिला (वय 36) यांचा अहवाल कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

इंद्रायणी कॉलनी महिला (वय 31), तुकाराम नगर येथील पुरुष (वय 40), प्रभाग क्र. 8 मध्ये मस्करनेस कॉलनीमध्ये पुरुष (वय 43) यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे.

यामध्ये लक्षणे नसल्याने 9 रुग्णांना गृहविलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले आहे. तर इतर सर्वाना संस्थात्मक कोविड -19 कक्षामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली.

आजअखेर तालुक्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 309 झाली असून यापैकी नऊ जणांचा मृत्यू, तर 135 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 165 असून यापैकी 117 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 48 जणांवर होम क्वारंटाईन करून उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 93 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 45 जण उपचार घेत आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.