Vadgaon : मावळमध्ये आज 47 पॉझिटिव्ह रुग्ण; शहरी भागात 24, ग्रामीणमध्ये 23 रुग्ण

Maval Corona Update Toady 47 Corona Positive Patients In Maval

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज, गुरुवारी विविध भागात मिळून एकूण 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरी भागातील 24 , तर ग्रामीण भागातील 23 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला.  आजच्या अहवालात शहरी आणि ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरी भागातील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत 14, लोणावळा नगरपरिषद हद्दीत प्रत्येकी 8, तर वडगाव नगरपंचायत हद्दीत 2,  अशा 20 रुग्णांचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागामध्ये वराळे, टाकवे बुद्रुक, आढले बुद्रुक येथे प्रत्येकी 4  रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तर तळेगाव ग्रामीण, ऊर्से, कोंडीवडे, गहुंजे, शिलाटने, माळवंडी ठुले, नायगाव, कोळेचा फेसर, भाजे, पिंपळोली, नवलाख उंब्रे या अकरा गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

_MPC_DIR_MPU_II

आजपर्यंत मावळ तालुक्यात एकूण 502  कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 188  रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 12 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 25 रुग्णांना आज, बुधवारी घरी सोडण्यात आले.

दरम्यान, आज एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या तालुक्यात 302  सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 151  रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, 151  रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असल्याची महिती तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.