Vadgaon : मावळ तालुक्यात आज आणखी 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Another 9 corona positive patients were registered in Maval taluka today तळेगाव दाभाडे व सोमाटणे येथील प्रत्येकी दोन, लोणावळा, निगडे, गहुंजे, वराळे, पाचाणे येथील प्रत्येकी एक अशा एकूण 9  रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व सोमाटणे येथील प्रत्येकी दोन, लोणावळा, निगडे, गहुंजे, वराळे, पाचाणे येथील प्रत्येकी एक अशा एकूण 9  रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. तालुक्यात आतापर्यंत एकूण- 127 (शहरी- 52 व ग्रामीण-75) जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 47 जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या मावळ तालुक्यात 74 सक्रिय कोरोना रुग्ण असून मृतरुग्णांची संख्या 6 झाली आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे येथील 42 वर्षीय व्यक्ती काल, शुक्रवारी (दि. 3) कोरोना बाधित आढळून आली होती. या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील त्यांचा 7 वर्षीय मुलाचा काल स्वॅब घेण्यात आला होता. आज शनिवार (दि 4) त्याचा चाचणी अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

तसेच श्रीनगरी येथील 49 वर्षीय व्यक्तीला लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल, शुक्रवारी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज, शनिवारी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.

सोमाटणे येथील 64 वर्षीय व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे. तसेच त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन नुकतेच झाले आहे. त्यांना श्वास घेण्यासह इतर त्रास झाल्याने गुरुवारी (दि. 2) खाजगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आली होती.

त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज, शनिवारी पाॅझिटिव्ह आला. पुढील उपचारासाठी त्यांना तळेगाव जनरल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सोमाटणे येथील दुसऱ्या 31वर्षीय व्यक्तीला ताप व श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. गुरुवारी (दि. 2) त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी (दि. 3) त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज, शनिवारी त्यांचा चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.

नांगरगाव, लोनावळा येथील 65 वर्षीय महिलेला गुरुवारी (दि. 2) खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कामशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर सदर महिलेला मधुमेह, उच्चरक्तदाब आदी आजारही आहेत.

काल, शुक्रवारी त्यांचा खाजगी लॅबमध्ये स्वॅब घेतला होता. आज, शनिवारी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्या निकटच्या संपर्कातील 18 व्यक्ती आहेत.

निगडे येथील 26 वर्षीय व्यक्ती पुणे येथे नोकरीस आहे. तेथील कार्यालयातील एका पाॅझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात सदर व्यक्ती आली. लक्षणे जाणवू लागल्याने पुणे येथे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेथे काल (दि 3) त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज, शनिवारी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

गहुंजे येथील 35 वर्षीय व्यक्तीही शेलारवाडी येथील पाॅझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आली. म्हणून त्यांचा खाजगी रूग्णालयात काल स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील पाच व्यक्ती आहेत.

वराळे येथील इको सिटीमधील 39 वर्षीय व्यक्तीला ताप व खोकल्याचा त्रास होता म्हणून खाजगी लॅबमध्ये काल (दि 3) त्यांचा स्वॅब घेतला होता. आज, शनिवारी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.

सदर व्यक्ती बावधन येथे नोकरी करत असून तीन महिन्यापासून कामावर गेली नाही. व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील पाच व्यक्ती आहेत.

पाचाणे येथील 55 वर्षीय व्यक्ती पिंपरी चिंचवड येथे दुध व्यवसायामुळे प्रवास झाला. खोकल्याचा त्रास होत असल्याने बिर्ला हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. तेथे काल स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. निकटच्या संपर्कातील चार व्यक्ती आहेत.

मावळात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी यांनी केले आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत 43 जणांना कोरोनाची लागण झाली असून 15 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एक जणांचा मृत्यू झाला असून आज एक रुग्ण सापडल्याने सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे.

तर मृतांची संख्या दोन झाली आहे,  अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड व डाॅ.  प्रवीण कानडे यांनी सांगितली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.