Vadgaon BJP : रस्ता रुंदीकरणाच्या कामात अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध

एमपीसी न्यूज – वडगाव शहर (Vadgaon BJP) अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामाच्या दर्जाविषयी व लागणा-या वेळेसंदर्भात साशंकता व्यक्त करणारे पत्र शहर भाजपाने 3 जून रोजी संबंधीत अधिका-यांना दिले. मात्र अधिका-यांकडून या संदर्भात कुठलीही चौकशी झाली नाही. याचाच पाठपुरावा करणारे आणखी एक पत्र 26 ऑगस्ट रोजी देण्यात आले. अधिकाऱ्यांना पत्र देऊनही रस्त्यांच्या कामाची चौकशी होत नसेल तर अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा सवाल शहर भाजप कडून उपस्थित केला आहे. यावर योग्य कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन देताना मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे, माजी स्वीकृत नगरसेवक तसेच शहर कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, माजी नगरसेवक भूषण मुथा तसेच भाजपा वडगाव शहर सरचिटणीस कल्पेश भोंडवे आदि उपस्थित होते.

वडगाव शहर अंतर्गत रस्ता रूंदीकरण काम गेले काही महिने चालू आहे. या कामाच्या दर्ज्याविषयी व लागणा-या वेळेसंदर्भात (टाईम लिमिट) साशंकता व्यक्त करणारे पत्र शहर भाजपाने 3 जून 2022 रोजी संबंधीत अधिका-यांना दिले होते. तथापि, अधिका-यांकडून या संदर्भात कुठलीही चौकशी झाली नाही.

RPI : आरपीआय पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी समीर जाधव

याचसंदर्भात पाठपुरावा करणारे पत्र आज दि.26 ऑगस्ट 2022 रोजी शहर भाजपाने पुन्हा एकदा संबंधित अधिका-यांना दिले व “यामध्ये अधिका-यांचेच आर्थिक संबंध गुंतले आहेत की काय” अशी खरमरीत विचारणा केली. तसेच, झालेल्या रोडचे बाजूला साईड पट्टी, फुटपाथ,पादचारी मार्गांवर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरु झाले ते सुद्धा निकृष्ठ दर्जाचेच चालू आहे. वास्तविक सदर फुटपाथची मुरूम व कपची टाकून पिचिंग करणे आवश्यक आहे. याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करण्यात आला आहे. या सर्व कामांची चौकशी, संबंधित अधिकारी यांनी करून सदर ठेकेदाराला जाब विचारावा अशी मागणी शहर भाजपचे वतीने करण्यात आली आहे.

तसेच येणा-या गणेशोत्सवासाठी (Vadgaon BJP) Mpc, mpc news, mpc latest news, mpc, Marathi News, Latest Marathi News, trending news, mpc news local, Local News, Top News, Latest Update, Top Marathi news, crime, crime news, Pimpri-Chinchwad, PimpriChinchwad, मराठी बातम्या, लेटेस्ट मराठी बातम्या, ताज्या बातम्या, एमपीसी न्यूजनागरिकांसाठी रस्ता व्यवस्थित करून, तदनंतर सात दिवसांनी होणाऱ्या गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ता हा सुसज्ज खुला करावा अशी मागणाही केली. आणि सदर संपूर्ण रोडचे कामाचे अंदाजपत्रक प्रत माहितीसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी अध्यक्ष अनंता कुडे यांनी केली आहे.

या सर्व गंभीर बाबींचा, गांभीर्याने विचार करून कामाची गती व सुधारणा वाढवावी, अन्यथा वडगाव भाजपा आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. सदर निकृष्ठ कामाचे पाहणी करताना वडगाव भाजपाचे संघटन मंत्री किरण भिलारे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, हरीश दानवे, रमेश ढोरे, अतुल म्हाळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.