Vadgaon : पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे पूर्ण करा – म्हाळसकर

Complete Nala cleaning work before monsoon - Mhalaskar

एमपीसीन्यूज : पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करावीत,अशी मागणी मनसे नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांनी आज वडगाव नगरपंचायतीकडे केली.

याबाबत म्हाळस्कर यांनी वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि आरोग्य व स्वच्छता समिती सभापती राजेंद्र कुडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,

सध्या वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होऊन तिथे चिखल होऊन अपघात व दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होऊ शकते.

परिसरातील ओढे, नाले, गटारी बुजलेल्या अवस्थेत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे त्या आणखी बुजतील आणि त्याचे पाणी सार्वजनिक रस्त्यावर, नागरीवस्तीमध्ये घुसण्याची शक्यता आहे.

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये, तसेच रोगराईचे प्रमाण वाढून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागू नये म्हणून पावसाच्या पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ओढे, नाले, गटारी आदींची साफसफाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, पाण्याच्या टाक्या साफ करून त्या निर्जंतुकिकरण करण्यात याव्यात, अशी मागणी म्हाळस्कर यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.