Maval Coroan News : मावळात आज 23 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; 33 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज, शनिवारी (दि.24) 23 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी एकाही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 196 मृत्यू झाले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7363 झाली आहे. तर दिवसभरात 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 20 रुग्ण शहरी भागात तर 03 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण 01, कामशेत 02 असे एकूण 03 रुग्ण आहे .

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 07 , लोणावळा नगरपरिषद हद्दीत 11 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 02 असे एकूण 20 रुग्ण सापडले आहेत. 329 रुग्ण सक्रिय आहेत. 6838 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे .

मावळ तालुक्यात आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आतापर्यंत 196 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2136 , लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1468 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 506 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4110 रुग्ण तर ग्रामीण भागात 3253 रुग्ण आढळून आले आहेत .  2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.