_MPC_DIR_MPU_III

Vadgaon crime News : हॉटेल चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

आरोपी अजित याने एका 50 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा वेगळा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हॉटेल चालकाला विनाकारण मारहाण करून हॉटेलमध्ये तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी साडेअकरा वाजता ब्राह्मणवाडी गावच्या हद्दीत प्रांजल हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणातील एका आरोपीविरुद्ध 50 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा वेगळा गुन्हा देखील दाखल झाला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

प्रशांत प्रदीप शिंदे (वय 26, रा. जुना पुणे-मुंबई हायवे रोड लगत, ब्राम्हणवाडी, साते, ता. मावळ) यांनी या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अजित अनिल सातकर, आकाश धुमाळ (पूर्ण नांव माहित नाही, दोघे रा. कान्हे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांचे ब्राह्मणवाडी गावात प्रांजल नावाचे हॉटेल आहे. शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता आरोपी शिंदे यांच्या हॉटेलमध्ये आले. विनाकारण आरोपींनी शिंदे यांचा चुलत भाऊ आदर्श शिंदे यांना दमदाटी केली. त्याचा जाब फिर्यादी शिंदे यांनी विचारला असता आरोपींनी त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हॉटेलमधील प्लास्टिक खुर्चीने देखील मारहाण केली. प्लास्टिक खुर्च्या आणि टेबल, काउंटर फोडून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

अजित सातकर याच्या विरोधात बलात्काराचाही गुन्हा दाखल

आरोपी अजित अनिल सातकर याच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 12) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अजित याने एका 50 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा हा गुन्हा आहे. याबाबत 50 वर्षीय पिडीत महिलेने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शनिवारी पहाटे तीन वाजता पिडीत महिलेच्या घरात घुसून महिलेच्या मुलाला शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच पिडीत महिलेला एका घरात ओढत नेऊन तिथे तिला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.