Vadgaon News : सातेमधील स्मशानभूमीतून मृतदेह दहन स्टँड चोरीला

एमपीसी न्यूज – जांभूळ व ब्राम्हणवाडी (साते) येथील स्मशानभूमीमधील मृतदेह दहन स्टँड चोरट्यांनी चोरून नेला आहे. या संदर्भात जांभूळ व ब्राम्हणवाडी येथील ग्रामसेवक राजकुमार सोनटक्के यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

स्मशानभूमीतील हायमॅक्स दिवे चोरीला गेले आहेत. मृतदेह दहन स्टँड नसल्याने मृतदेह दहन करताना रचलेले सरण कोसळून अवयव अपूर्ण जळल्याचे प्रकार घडत आहे.

ब्राम्हणवाडी येथील दोन व जांभूळ येथील दोन असे एकूण चार मृतदेह दहन स्टॅन्ड चोरीला गेले आहेत. स्मशानभूमीत केवळ अंत्यसंस्कार, सावडणे व दशक्रिया आदी विधीला गर्दी असते.

इतरवेळी स्मशानभूमीत निर्मनुष्य असते. चोरटे बिनधास्त पणे स्मशानभूमीतील मृतदेह दहन स्टँड व हायमॅक्स दिवे चोरून नेले आहेत. चोरटे स्मशानभूमीत डल्ला मारत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्मशानभूमीला शासनाकडून नुकत्याच मृतदेह दहन स्टॅन्ड भेटले होते. त्याची चोरी झाल्याने रक्षण कोण करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मशानभूमी निर्मनुष्य ठिकाणी असल्याने चोरट्यांची हिम्मत वाढत आहे.

माजी उपसरपंच रामदास शिंदे, ग्रामस्थ जगन्नाथ शिंदे, उमेश शिंदे, बजरंग नवघणे, विजय शिंदे, प्रवीण शिंदे, कान्हू बोऱ्हाडे आदींनी या चोरट्यांना अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.